भारतात मुस्लीम सर्वात सुखी: मोहन भागवत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

भारतात मुस्लीम सर्वात सुखी: मोहन भागवत

https://ift.tt/2pjDFnC
भुवनेश्वर: भारतात परिवर्तनासाठी केवळ हिंदुंनाच नव्हे; तर संपूर्ण समाजाला संघटित करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे, असं प्रतिपादन यांनी केलं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकोप्यामुळं मुस्लीम, पारसी आणि अन्य धर्माची लोकं देशात सुरक्षित असल्याचा अनुभव घेतात, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेतील उपस्थितांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं. समाजाला संघटित करण्याची आवश्यकता आहे आणि संघ त्या दिशेनं काम करत आहे, असं भागवत यांनी सांगितलं. आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही. एका चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला एकत्रित पुढे जायला हवं. देशात परिवर्तन आणण्यासाठी आणि विकासासाठी हे करायला हवं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. विचार आणि संस्कृती यांच्यात विविधता असूनही भारतातील नागरिक स्वतःला समान समजतात, असेही ते म्हणाले. वाचा: भारतात मुस्लीम सर्वात सुखी 'भारतात एकतेचं दर्शन घडतं. देशातील एकात्मतेमुळं मुस्लीम, पारसी आणि अन्य धर्माच्या लोकांना या देशात अधिक सुरक्षित वाटतं. पारसी भारतात सर्वात सुरक्षित आहेत. याशिवाय मुस्लीम नागरिकही खूश आहेत,' असं मोहन भागवत म्हणाले. समाजात परिवर्तन घडवणारे आणि देशाचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका निभावणारी चांगली माणसं आपण घडवली पाहिजेत, असंही भागवत यांनी सांगितलं. जे.पी. नड्डा संघाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता सरसंघचालक मोहन भागवत हे ओडिशाच्या नऊ दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. भुवनेश्वरमध्ये त्यांचं शनिवारी आगमन झालं. सूत्रांनी सांगितलं की, मोहन भागवत यांच्यासह भैयाजी जोशीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणी समितीची बैठक एका खासगी विद्यालयात १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सुद्धा या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. ते पुढील आठवड्यात ओडिशाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.