'विकासासाठी पक्ष सोडला म्हणे, ४० वर्षे गवत उपटत होते का?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

'विकासासाठी पक्ष सोडला म्हणे, ४० वर्षे गवत उपटत होते का?'

https://ift.tt/2M99mJ2
अहमदनगर: राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मधुकर पिचड यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं. आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असे सांगतात, मग काय चाळीस वर्षे गवत उपटत होतात काय? असा घणाघात त्यांनी केला. अहमदनगरमधील अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली. अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय?, असा सवाल पवार यांनी यावेळी केला. पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची असं म्हणत त्यांनी पुन्हा हातवारे केले. समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही त्यांनी केला. शरद पवार काय म्हणाले? समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची? गेल्या पाच वर्षांत अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक वीटही सरकारला रचता आली नाही. जेथे शिवाजी महाराजांची तलवार तेजाने चमकली, आज त्या गड-किल्ल्यांवर दारुचे अड्डे सुरू करण्याचे काम या सरकारने चालवले आहे. राज्यात यावर्षी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर, सरकार सांगत आहे की आम्ही ३१ टक्के लोकांची कर्जमाफी केली आहे. पण राज्यातील ६९ टक्के लोकांचे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-मागे फिरून गृहमंत्री झालेले आज आम्हाला विचारतात काय काम केले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश असो वा कोणतेही राज्य, यांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान केला जात नाही. सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या राजवटीमध्ये घडत असल्याने त्यांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल.