...म्हणून राधिकानं लग्नात नेसली विरलेली साडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2019

...म्हणून राधिकानं लग्नात नेसली विरलेली साडी

https://ift.tt/32qZCzC
मुंबई: कलाकार आणि त्यांच्या रंगीबेरंगी, महागड्या फॅशनेबल कपड्यांची नेहमी चर्चा होत असते. अभिनेत्री राधिका आपटेनं तिच्या फॅशनच्या आवडीनिवडीबाबत सांगताना तिच्या लग्नातली एक आठवण सांगितली. २०१२ साली तिचा विवाह झाला. त्यावेळी विवाहसोहळ्यामध्ये तिनं तिच्या आजीची साडी नेसली होती असा खुलासा तिनं केला. राधिकानं तिच्या लग्नाच्या दिवसाबद्दल सांगताना तिची ही आठवण सांगितली. 'माझी आजी माझ्या सर्वात जवळची व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यातील खास दिवशी ती माझ्या जवळ असावी असं मला वाटत होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशी मी तिची साडी नेसायचे ठरवले. ती आजीची जुनी साडी असल्याने जीर्ण झाली होती, त्याला बारिक-बारिक छिद्रसुद्धा पडली होती. पण तिची साडी माझ्यासाठी खूप खास होती. मुळात मला जास्त फॅशनेबल कपडे घालायला आवडत नाही किंवा कपड्यांवर फार पैसा खर्च करायलादेखील आवडत नाही. मी नोंदणी पद्धतीनं विवाहबद्ध झाले त्यामुळे त्या दिवशी मी आजीची साडी नेसली आणि आम्ही आमच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्र मंडळींना ज्यावेळी आमच्या लग्नाची छोटी पार्टी दिली त्यावेळीसुद्धा मी अगदी १० हजारापेक्षा कमी किमतीचा एक ड्रेस घातला होता.' असं राधिकानं सांगितलं. राधिका आपटेने २०१२ मध्ये संगीतकार बेनडीक्ट टेलरशी विवाहगाठ बांधली. तो लंडनमध्ये असतो. राधिका कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली असताना बेनडीक्टशी तिची ओळख आणि मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि राधिका- बेनडीक्ट एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर वर्षभरानं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घेतला. आपापल्या कामात व्यग्र असल्यानं ही जोडी फार कमी वेळा एकमेकांना भेटते अशीही चर्चा होती. नेहमी फॅशनेबल कपड्यांत दिसणाऱ्या राधिकानं सांगितलेला हा किस्सा तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. राधिकाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल नेहमीच अशी चर्चा रंगत असते. मध्यंतरी चर्चा रंगली होती ते राधिकाच्या टॅटूबाबत... अलीकडेच एका सोहळ्यासाठी आली होती. यावेळी रेड कार्पेटवर आली असताना फोटोसाठी तिनं पोझ दिली. तेव्हा तिच्या पायावर 'B' या अक्षराचा टॅटू ठळकपणे दिसत होता. हा टॅटू म्हणजे तिचा संगीतकार असलेला नवरा बेनडीक्ट टेलरच्या नावावरुन काढला असल्याची चर्चा आहे.