...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 1, 2019

...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका

https://ift.tt/2niZMK4
मुंबई: 'ओम शांति ओम', 'चेन्‍नई एक्‍स्प्रेस' आणि 'हॅपी न्‍यू इयर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली जोडी म्हणजे अभिनेत्री आणि अभिनेता . केवळ ऑन स्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिनदेखील दीपिका आणि शाहरूखची चांगली मैत्री आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पण सध्या दीपिका किंग खानवर नाराज झाली आहे. दीपिका पादुकोणच्या एका पोस्टमुळे शाहरूख खान आणि ती एकमेकांचे किती चांगले मित्र आहेत हे लक्षात येईल. बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरूख सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्राम असो किंवा ट्विटर तो सतत त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असतो. अलीकडेच शाहरूखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. स्वत:चा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत त्याने लिहिलंय की, 'मी संपूर्ण रात्र जागं राहून माझ्या लायब्ररीची साफ-सफाई केली. सध्या मी तुम्हाला फार विस्कटलेला दिसेन पण त्या धुळीला पार करत माझ्यापर्यंत येणारा पुस्तकांचा विशिष्ट सुगंध मला अतिशय आनंद देणार आहे.' असं त्याने या फोटोसोबत लिहिलं होतं. शाहरूखचा हा फोटो पाहून दीपिकानं तो ट्विटरवर शेअर करत त्याला आठवण करून दिली की 'तू मला फोन करणार होतास...त्याचं काय झालं?' दीपिकानं केलेल्या या ट्विटवरून कॉल करायला विसरलेल्या आपल्या मित्रावर दीपिका नाराज झालीय हे समजतंय. तिनं आपल्या मित्राला कानपिचक्या देत याची आठवणदेखील करून दिली. परंतु, हा फोन नेमका कशासंदर्भात होता हे मात्र समजू शकलं नाहीए. त्यांचे हे बोलणं पाहता शाहरूख आणि दीपिकाच्या आगामी चित्रपटाची ही चाहूल असू शकते असा अंदाज त्यांचे अनेक चाहते लावत आहेत. शाहरूख खानचा 'झिरो' चित्रपट मोठ्या पडद्यावर आपटल्यानंतर शाहरूख कोणत्याही सिनेमात दिसला नाहीए. लागोपाठच्या फ्लॉप्सचा त्यानं एवढा धसका घेतलाय की अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा त्यानं केलेली नाही. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाविषयी उत्सुकता आहे. तो सध्या एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन व हेमा मालिनीच्या सुपरहिट 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाचा रिमेक लवकरच बनणार असून या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता शाहरूख खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. दीपिका पादुकोण मात्र सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लक्ष्मी अग्रवाल या अॅसिडहल्ला पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या 'छपाक' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी '83' या सिनेमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर भारतीय कर्णधार कपिल देव यांची भूमिका करत आहे, तर दिपीका त्यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका साकारणार आहे.