
मुंबई: राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत पक्षांतरासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्याने अनेक दिग्गज उमेदवारांसाठी आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. जाणून घेऊया राज्यातील मतदानाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... अपडेट्स... >> जालना: रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क >> मुंबई: राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क >> शिर्डी: राधाकृष्ण विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क >> सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी, तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उदयराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क >> आपला प्रतिनिधी निवडून देणे हे प्रत्येक मतदाराचे राष्ट्रीय कर्तव्य- मोहन भागवत >> नोटा पर्यायावर आमचा विश्वास नाही- मोहन भागवत >> सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मतदारांना आवाहन >> सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात भाऊसाहेब दफ्तरी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क >> मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे अजित पवार यांचे राज्यातील मतदारांना आवाहन >> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार यांनी सपत्निक बारामती मतदारसंघात केले मतदान >> सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही आजच >> राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात >> आज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ >> घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे 'मटा ऑनलाइन'कडून राज्यातील मतदारांना आवाहन >> राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात होत आहे.