
मुंबई: रेल्वेने आज रविवारी मध्य रेल्वे आणि घोषित केला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान लोकल धावणार नाहीत, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशीदरम्यान आज (रविवारी) मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. याबरोबच शनिवार-रविवारी मध्यरात्री वसई रोड-भाईंदर स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक असल्या कारणाने आज (रविवार) लोकल फेऱ्या सुमापे २० मिनिटे विलंबाने धावणार आहे. असा असेल मध्य रेल्वे स्थानक - माटुंगा ते मुलुंड मार्ग - डाऊन धीमा वेळ - स.१०.५७ ते दु.३.५२ परिणाम - मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. मेगा ब्लॉक दरम्यान विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर लोकल नसतील. याबरोबरच अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे स्थानक - पनवेल-वाशी मार्ग - अप आणि डाऊन वेळ - स.११.३० ते दु.४.०० परिणाम - पनवेल-वाशी दरम्यान आणि पनवेल-अंधेरी लोकल फेऱ्या बंद ब्लॉककाळात बंद राहणार आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या ११ ते ५ या वेळेत विलंबाने धावणार आहे. पश्चिम रेल्वे स्थानक - वसई रोड-भाईंदर मार्ग - अप आणि डाऊन जलद वेळ - शनिवार मध्यरात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.०० परिणाम - पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक काळात डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . तर. रात्री उशीरा धावणाऱ्या लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येत आहेत . तांत्रिक बिघाड गोरेगाव स्थानकात शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. १५ मिनिटांत बिघाड दुरुस्त करुन या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र बिघाडामुळे काही लोकल फेऱ्या सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबानेच धावत होत्या. आज मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विलंबाचा त्रास सहन करावा लागणार आहे.