बिहारमधील पूरग्रस्तांना अक्षयची १ कोटींची मदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

बिहारमधील पूरग्रस्तांना अक्षयची १ कोटींची मदत

https://ift.tt/2JuyHvn
मुंबईः बिहारमध्ये आलेल्या पुरास्थितीतून अद्यापही तिथले नागरिक सावरले नाहियेत. अजूनही नागरिकांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं मदत देत आहेत. बॉलिवूड अभिनेते यांनीही काही दिवसांपूर्वी ५१ लाखांची मदत केली होती. त्यानंतर अलीकडेच बॉलिवूडचा खिलाडी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षयनं बिहारमधील पूरग्रस्तांना एक कोटींची मदत केली आहे. अक्षयनं अलीकडेच आसाममधील पूरग्रस्तांसाठी दोन कोटींची मदत देऊ केली होती. त्याचबरोबर बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही अक्षयनं एक कोटी रुपये दिले आहेत. अक्षयनं दिलेल्या एक कोटींमुळ बिहारमधील जवळपास २५ कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लागणार आहे. अक्षय छठ पूजेच्या दिवशी प्रत्येक कुटुंबांला ४ लाख देणार आहे. 'नैसर्गिक आपत्तीपुढं मनुष्य काहीच करू शकत नाही, अशावेळी आपणच एकमेकांची साथ द्यायला हवी. पूरात ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे त्यांची मदत करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण केलेल्या मदतीमुळं ते आपलं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतात.' असं अक्षय कुमार म्हणाला. बिहारमध्ये आलेल्या पुरामुळं लाखो लोकांचे संसार उध्द्वस्त झाले. हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार १३६.५८ कोटींचा मदत निधी दिला होता. तसंच, केंद्र सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.