कारचे उघडलेले दार लागले; दुचाकीस्वार ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

कारचे उघडलेले दार लागले; दुचाकीस्वार ठार

https://ift.tt/2PCpo0r
म.टा. प्रतिनिधी, नागपूर कारचालकाने ऐनवेळी उघडलेल्या दाराची धडक बसून दुचाकीस्वार ज्येष्ठ ठार झाला. ही घटना सतत गजबजलेल्या व वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या चौक ते चौकदरम्यान शनिवारी सकाळी घडली. ज्येष्ठ वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जात होता, असे कळते. वसंतराव महादेव चौधरी (६५, रा. जुना फुटाळा) असे मृताचे नाव आहे. चौधरी त्यांच्या दुचाकीने (एमएच/३१/बीएक्स/८१७६) लॉ कॉलेज चौक ते ते कॉफी हाउस चौक या मार्गावरून विरुद्ध दिशेने (राँग साइड) जात होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी एका अज्ञात कारचा दरवाजा त्यांना लागला. यामुळे ते खाली पडले आणि जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता रविनगरातील सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांशी संपर्क साधला ते म्हणाले, ‘चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौधरी हे कॉफी हाउस चौक ते लॉ कॉलेज चौक या मार्गाने जात होते. ते विरुद्ध दिशेने जात होते की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज बघितल्यावर ते लक्षात येईल. तूर्तास याप्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.’