मुस्लिम ऐकणार नाहीत, मुलं जन्माला घालणारच: अजमल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 28, 2019

मुस्लिम ऐकणार नाहीत, मुलं जन्माला घालणारच: अजमल

https://ift.tt/2NoqoCC
गुवाहाटी: 'तुम्ही कितीही कायदे करा. मुस्लिम समाजावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही कुणाचंही ऐकणार नाही. आम्ही जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणारच ,' असं धक्कादायक वक्तव्य ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ)चे अध्यक्ष यांनी केलं आहे. दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घालणाऱ्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही असा कायदा करण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजमल बोलत होते. 'मुस्लिमांमध्ये साक्षरता वाढते आहे. मुस्लिम तरुण जगभर काम करत आहेत. भारतात मात्र वेगळं चित्र आहे. सच्चर समितीच्या अहवालानुसार, भारतात २ टक्क्यांपेक्षाही कमी तरुणांना सरकारी नोकरी मिळते. असं असतानाही मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या मिळू नयेत म्हणून आसाम सरकार कायदा करत आहे. पण, मुस्लिमांवर याचा काहीही फरक पडणार नाही. ते जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतच राहणार. ज्याला जगात यायचं आहे तो येणारच. त्याला कोणाही रोखू शकत नाही, असं आमचा धर्म मानतो. माझाही तसा विश्वास आहे. नैसर्गिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं योग्य नाही. निसर्गाशी खेळ करू नका. मुस्लिम त्यांना वाटेल तसं वागतील. नंतर ओरडत बसू नका,' असा इशाराही अजमल यांनी दिला आहे. 'एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दहा-दहा मुलं जन्माला घालण्याची भाषा करतात आणि दुसरीकडं दोन पेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी नोकरी दिली जाणार नाही, असं सरकार म्हणतंय. आधी त्यांनी नेमकं काय ते ठरवावं. ते आरएसएसला मानत नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी केला. सच्चर समितीच्या अहवालानुसार, भारतात २ टक्क्यांपेक्षाही कमी मुस्लिमांना सरकारी नोकरी मिळते. काही दिवसांपूर्वी आसाम सरकारच्या मंत्रिमंडळानं दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी न देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवकरच हा प्रस्ताव विधानसभेत येणार आहे. आसाममध्ये भाजप सरकार बहुमतात असल्यानं हा कायदा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अजमल यांनी आधीच विरोधाची भूमिका घेतली आहे.