'सैराट'मधील परशाचा मेकओव्हर; पाहा फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

'सैराट'मधील परशाचा मेकओव्हर; पाहा फोटो

https://ift.tt/34buhS6
मुंबईः '' चित्रपटात परशाची भूमिका वठवून रातोरात स्टार झालेला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'सैराट', 'एफयू', 'लस्ट स्टोरी'नंतर आकाश कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. आकाश नक्की कुठंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. नुकताच आकाशचा नवीन लूक समोर आला आहे. आकाशनं हा मोकओव्हर नेमका कशासाठी केलाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. आकाशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. डोक्यावर टोपी, गळ्यात मफलर आणि डोळ्यावर चष्मा अशा कुल लूकमध्ये आकाश दिसतोय. आकाशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या फोटोला २५ हजारांपेक्षा अधिक लाइक्स आले आहेत. सैराटनंतर आकाशनं महेश मांजरेकरांचा 'एफयू- फन अनलिमिटेड' या चित्रपटात काम केलं होतं. तसंच, करण जोहरच्या 'लस्ट स्टोरीज' या वेबसिरीजमध्ये तो अभिनेत्री राधिका आपटेसोबत झळकला आता. आकाश 'एफयू' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. 'सैराट'नंतर आकाश पुन्हा एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबत काम करणार आहे. मंजुळेंच्या 'झुंड' या चित्रपटात तो भूमिका साकारतोय. 'झुंड' या नागराज मंजुळेंचा महत्त्वकांशी सिनेमा आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १३ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.