कुर्ला स्थानकात दगड भिरकावला; टीसी जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

कुर्ला स्थानकात दगड भिरकावला; टीसी जखमी

https://ift.tt/2MSz3xY
मुंबई: कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर एका अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे टीसीला दुखापत झाली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने या अज्ञात हल्लेखोराचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. काल रात्री साडे अकराच्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर तिकीट तपासणीस कार्यालयात ४ बसलेले होते. त्यावेळी एक व्यक्ती बाहेरून धावत येत तिने टीसींच्या दिशेने दगड भिरकावला. त्यानंतर या अज्ञात हल्लेखोराने टीसींना शिवागाळही केली आणि ती व्यक्ती पुन्हा वेगाने कार्यालयाबाहेर पळाली. या व्यक्तीने भिरकावलेला दगड कार्यालयात बसलेल्या सिकंदर सिंग या टीसीच्या गालाला लागला. सिंग यांना तातडीने उपचारासाठी भायखळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही अज्ञात व्यक्ती कोण आहे, तिने कोणत्या उद्देशाने टीसींवर हल्ला केला याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. ही व्यक्ती माथेफिरू आहे का, किंवा मानसिक संतुलन बिघडलेली आहे का, किंवा या मागे आणखी काय कारण आहे याचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.