भारताचे लोहपुरूष यांची आज १४४ वी जयंती देशभर साजरी होत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाहुयात, सरदार पटेल जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे अपडेट्स... अपडेट्स... >> गुजरात:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिली आदरांजली >> गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याला वाहिली आदरांजली >> गुजरात: केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे पोहोचले >> गुजरात: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडियात 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे सरदार पटेलांच्या पुतळ्याला अभिवादन करणार