
पुणे: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारादरम्यान ढवळून काढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल, याबाबत संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता आहे. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स... >> बारामतीमधून अजित पवार आघाडीवर >> कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील टपाल मतमोजणी सुरू >> इचलकरंजी मतमोजणी कक्षात मीडियाला प्रवेश बंदी >> पंढरपूरमधून भाजपचे सुधाकर परिचारक आघाडीवर >> काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूरमधून पिछाडीवर >> अहमदनगर: कर्जत-जामखेडमधील प्राथमिक कल हाती, भाजपचे राम शिंदे आघाडीवर; राष्ट्रवादीचे रोहित पवार पिछाडीवर >> अहमदनगर: शहर मतदारसंघातील मोजणी सुरू... सर्वात प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू >> पुणे: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी हे पास केले जप्त >> पुणे मतमोजणी केंद्रावर एका इन्फो सोल्युशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माध्यम प्रतिनिधी म्हणून पास देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस >> मावळमध्ये भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर >> पक्षांतरामुळं गाजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला >> विधानसभेच्या २८८ जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी; उदयनराजे पुन्हा लोकसभेत जाणार? >> महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचा दिवस; विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार