
औरंगाबादः मराठवाड्यातील परळी मतदारसंघाच्या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठवाड्यातील या मतदारसंघात पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. निवडणुकीआधी या दोन्ही भावा-बहिणीमध्ये झालेला वाद, आक्षेपार्ह विधान, पंकजा मुंडे यांना आलेली भोवळ, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेवून जीवन संपवून टाकावं वाटणारं केलेलं विधान या सर्व घडामोडीनंतर पार पडलेलं मतदान. मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान करतणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मराठवाड्यातील अन्य मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. घनसावंगी मतदार संघात माजी मंत्री राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे हिकमत उढाण यांची तर परतूर मतदारसंघात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेश कुमार जेथलिया यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. पाहा क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स.... >> जालनाः शिवसेनेचे अर्जुन खोतकर आघाडीवर. >> पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष >> जालना, परतूर, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात >> विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात