६४ MP कॅमेरा; 'रेडमी नोट -८ प्रो'चा आज सेल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

६४ MP कॅमेरा; 'रेडमी नोट -८ प्रो'चा आज सेल

https://ift.tt/2J9eqvi
xiaomiचे दोन लेटेस्ट ' आणि ' प्रो' हे दोन फोन पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदी करता येणार आहेत. या फोनचा क्वॉड कॅमेरा सेटअप हे याचं खास वैशिष्ट्य आहे. आज हे दोन्ही फोन सेल अंतर्गत खरेदी करता येणार आहेत. आज दुपारी १२ वाजता हा सेल सुरू होणार आहे. xiaomiची अधिकृत वेबसाइट mi.com वर हे दोन्ही फोन खरेदी करता येणार असून अॅमेझॉन.कॉमवरही हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या अंतर्गतही हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. काय आहेत ऑफर्स? रेडमी नोट आणि रेडमी नोट प्रोचा पहिलाच सेल असल्यानं कंपनीकडून खास ऑफर आणि डिस्काऊंट देण्यात येण्याची शक्यता आहे. अॅक्सिस बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांसाठी १० टक्के डिस्काऊंट असणार आहे. रेडमी नोटची किंमत ही ९९९९ रुपये इतकी आहे. आणि रेडमी नोट प्रोची किंमत १४,९९९ रुपये इतकी आहे. रेडमी नोट प्रो ६जीबी+६४ जीबी, ६ जीबी+१२८ जीबी आणि ८ जीबी+ १२८ जीबी अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. तर रेडमी नोट-८ हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा व्हेरियंटमध्ये येणार आहे. 'रेडमी नोट ८ प्रो 'ची वैशिष्ट्ये या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर ६४ -मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य तीन सेन्सर ८ एमपी + २ एमपी +२ एमपी चे आहेत. हा फोन गॅमा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक कलरमध्ये लाँच झाला आहे. त्याचा डिस्प्ले गोरिल्ला ग्लाससह ६.५३ इंचाचा आहे. 'रेडमी ८' ची वैशिष्ट्ये रेडमी ८ चा व्हेरिएंट लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत ७,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आहे तर इंटरनल मेमरी ६४ जीबी आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ एमपी + २ एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे आणि त्याची स्क्रीन ६.२२ इंच आहे.