
मतदानाच्या दिवशी नागरिकांना दिलासा दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. सोमवारी रात्रीच राज्यातील काही भागांत गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज, मंगळवारी देखील मुंबईकर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेत आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनने निरोप घेऊनही मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. २३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. >> पुणे: गेल्या काही तासांपासून पावसाची विश्रांती >> अहमदनगर: मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले, धरणातून १ हजार १०० क्यूसेस वेगाने मुळा नदीत पाण्याचा विसर्ग >> पुणे: मुसळधार पावसामुळे येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, पद्मावती, मार्केट यार्ड परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी >> पुणे: मुसळधार पावसामुळे पद्मावतीच्या गुरुराज सोसायटीमध्ये शिरले पाणी