'एचपी'चा दमदार बॅटरीवाला लॅपटॉप लाँच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 13, 2019

'एचपी'चा दमदार बॅटरीवाला लॅपटॉप लाँच

https://ift.tt/36ZWKMY
नवी दिल्लीः एचपीनं आपला नवा Elite Dragonfy लॅपटॉप बाजारात आणला आहे. एचपीचा हा लॅपटॉप कन्व्हर्टेबल असून यात अल्ट्रालाइट १३ इंच फॉर्म फॅक्टर टच स्क्रीन डिस्प्ले, क्वॉड कॉर ८ जनरेशन प्रोसेसर दिला आहे. या लॅपटॉपचे वैशिष्ट्य म्हणजे यात चोवीस तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. तसंच, गीगाबाइट-क्लास नेटवर्क कनेक्टिव्हीटीचा पर्यायही देण्यात आला आहे. एचपीच्या या लॅपटॉपमध्ये प्रायव्हसी फिचर्सही देण्यात आले असून या लॅपटॉपचे वजन १ किलोपेक्षाही कमी आहे. अल्ट्रा मॅन्गिशीअर चेसिस असलेल्या या नोटबुकमध्ये डायमंड कट अॅक्सेंटसोबतच मॅट फिनिशिंग पेंटवर्क आणि एमआयएच एसटीडी ८१० स्टँटर्ड बिल्ड क्वॉलिटी देण्यात आली आहे. कंपनीनं लॅपटॉपमध्ये बॅकलाइट कीबोर्ड दिला आहे. चार वर्किंग मोडवर काम करतो हा लॅपटॉप लॅपटॉपवर काम करत असताना युजर्सना तीन डिस्प्लेचे पर्याय देण्यात आले आहेत. यातील एक डिस्प्लेची युजर्स निवड करू शकतात. प्रायव्हसी, एचडीआर आणि लो पॉवर असे हे तीन पर्याय आहेत. तसंच, हा लॅपटॉप तुम्ही चार वेगळ्या डिव्हाइसमध्ये वापरू शकता. लॅपटॉप, टॅबलेट, टेन्ट आणि मीडिया यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. यात युजर्सना विंडोज १०सुद्धा देण्यात आलं आहे. बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनचा पर्याय बॅकअपसाठी युजर्सना चार सेलची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा का बॅटरी फुल्ल चार्ज झाली की २४ तासापर्यंत लॅपटॉप पुन्हा चार्ज करण्याची आवश्यकता नाही. हा लॅपटॉप फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. फक्त अर्धा तासात ५० %पर्यंत चार्ज होतो. कनेक्टिव्हीटीसाठी कंपनीनं दोन युएसबी-सी थंडरबोल्ट पोर्ट्स, एक युएसबी ए पोर्ट आणि स्टँडर्ड कनेक्टिव्हीटी पर्याय दिले आहेत. तसंच, युजर्सच्या सुरक्षिततेसाठी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यात आली आहे.