'हे' ४९ धोकादायक Apps तातडीने डिलीट करा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 13, 2019

'हे' ४९ धोकादायक Apps तातडीने डिलीट करा

https://ift.tt/2CEHXJG
मुंबई : अधिक चांगले फोटो येण्यासाठी किंवा गेमिंगसाठी युझर्स थर्ड पार्टी Apps चा वापर करतात. पण वर ४९ असे App आढळून आले आहेत, जे गुगल सिक्युरिटी सिस्टमच्या डोळ्यात धूळ फेकून युझर्ससाठी त्रासदायक ठरू शकतात. यामध्ये थर्ड पार्टी फोटो Apps आणि गेमिंग Apps चा समावेश आहे. ट्रेंडमायक्रोच्या रिपोर्टनुसार, हे ४९ Apps विविध ३० लाख फोनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या रिपोर्टनुसार, या सर्व Apps चा मलीशस कोड कस्टम अल्गोरिदमने भरलेला आहे. एवढंच नव्हे, तर हे Apps गुगल क्रोमला डिफॉल्ट अॅडवेअर ब्राऊजर बनवतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एखादा क्रोम शॉर्टकट दिसत असेल, तर तुमच्या मोबाइलवर मालवेअर हल्ला झाला आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. धोकादायक मालवेअर इंस्टॉल केल्यानंतर काही तासांनी विविध जाहिराती दाखवणं सुरू करतात. त्यामुळे या जाहिराती नेमक्या कोणत्या Apps मुळे दिसतात याचा शोध घेणं कठीण ठरतं. हे Apps बंद करणंही कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रेंडमायक्रोने सावध केल्यानंतर गुगलने हे सर्व Apps प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. कोणकोणत्या Apps चा समावेश? गुगलकडून हे Apps डिलीट करण्यात आले असले तरी लाखो स्मार्टफोनमध्ये अजूनही या Apps चा वापर सुरु आहे. युझर्स याबाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे डेव्हलपर्स याचा फायदा घेत आहेत. खाली दिलेल्या यादीत पाहून तुम्ही Apps डिलीट करू शकता. ट्रेंडमायक्रोने यापूर्वीही गुगल प्ले स्टोअरवर मलीशिअस Apps शोधून काढले होते. ऑगस्टमध्ये ट्रेंडमायक्रोच्या संशोधकांनी ८५ मलीशस Apps चा शोध लावत माहिती जारी केली होती. याशिवाय ESET ने प्ले स्टोअरवरील ४२ Apps च्या कोडमध्ये एक व्हायरस असल्याचीही माहिती ऑक्टोबरमध्ये दिली होती. बहुतांश मालवेअर युझर्सना जबरदस्तीने जाहिरात दाखवण्याचं काम करतात. त्यामुळे युझर्सच्या इतर डेटासह पैशांचीही चोरी होऊ शकते.