'मुख्यमंत्री सेनेचाच, कुठलाही प्रस्ताव येणार, जाणार नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 6, 2019

'मुख्यमंत्री सेनेचाच, कुठलाही प्रस्ताव येणार, जाणार नाही'

https://ift.tt/36FMFEr
मुंबई: विधानसभेची मुदत संपण्याला अवघे ३ दिवस उरले असतानाही राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. शिवसेने प्रस्ताव द्यावा, मु्ख्यमंत्रिपदाबाबात भारतीय जनता पक्षाची तयारी आहे, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले असले तरी देखील भाजपच्या हे म्हणणे शिवसेनेने फेटाळून लावले आहे. भारतीय जनता पक्षाला आता कोणताही प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आता कोणताही प्रस्ताव येणार नाही, किंवा जाणार नाही, लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलंय तेच होणार, , असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा, अशी मागणी शेतकरी त्यांच्याकडे करत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 'दोन्ही पक्षांची मुख्यमंत्रिपदावर सहमती बनली होती' गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांदरम्यान सत्तावाटपाचा मुख्यमंत्रिपदासह ५०-५० फॉर्म्युला ठरलेला होता, याचा संजय राऊत यांनी पुनरुच्चार करत नव्या प्रस्तावाचा मुद्दा फेटाळून लावला. ठरल्याप्रमाणे कार, जे ठरलंय तेच पुढे घेऊन जा, असे आवाहन राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला केले आहे. मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्यानंतरच राज्यात शिवसेना-भाजप युती झाली आणि विधानसभेची निवडणूक लढवली गेली. राज्यातील शेतकरी शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, याकडे राऊत यांनी पुन्हा लक्ष वेधले आहे. 'राष्ट्रपती राजवटीला आम्ही जबाबदार नसू' भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही आणि जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर या स्थितीला शिवसेना जबाबदार नसेल, असे संजय राऊत म्हणाले. राज्यावर राष्ट्रपती राजवट जर विनाकारण कुणी थोपवली तर तो राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा सर्वात मोठा अपमान ठरेल, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल,आणि अधर्माचा विजय होईल, असे राऊत म्हणाले.