उघड्यावर प्रातर्विधी केल्याने शिधावाटप रोखले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2019

उघड्यावर प्रातर्विधी केल्याने शिधावाटप रोखले

https://ift.tt/2JIr8Be
वृत्तसंस्था, बेहरामपूर (ओडिसा) उघड्यावर प्रातर्विधी केल्याने गंजम जिल्ह्यातील २०हून अधिक कुटुंबांना ११ दिवसांपासून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत होणारे रोखण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या पंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गौतमी पंचायतीचे सरपंच सुशांत स्वैन यांनी दिली, मात्र आणि राज्य अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला मिळणारे लाभ कमी करता येत नाहीत, असे गंजम जिल्हाधिकारी विजय अमृता कुनेज यांनी सांगितले. उघड्यावर, विशेषत: रस्त्याच्या बाजूला प्रातर्विधी करताना कोणी आढळल्यास पंचायत शिधावाटप पुरवठादाराला त्या व्यक्तींचे महिनाभरासाठी शिधावाटप रोखण्याच्या सूचना देईल, असे स्वैन यांनी सांगितले. शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचेही ते म्हणाले. बचत गटाच्या जवळपास ३०० महिला पंचायत क्षेत्रात पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान आणि संध्याकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान गस्त घालतात. जर उघड्यावर प्रातर्विधी करताना कोणी आढळण्यास त्याची माहिती पंचायतीला देतात. सुरुवातीला अनेक ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध केला, परंतु आता उघडव्यावर प्रातर्विधी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असा दावा सरपंचांनी केला. ब्लॉक कार्यालयाशी या विषयावर चर्चा केली जाईल आणि सगळ्या लाभार्थींना शिधावाटप मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.