अरेच्चा! अनन्यानं कार्तिकची मिशीच कापली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2019

अरेच्चा! अनन्यानं कार्तिकची मिशीच कापली

https://ift.tt/2r5DPzM
मुंबई: एखाद्या भूमिकेच्या लूकसाठी कलाकार खूप मेहनत घेत असतात. आगामी 'पती पत्नी और वो' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्यासाठी त्यानं खास मिशी वाढवली होती. पण, एका शोच्या सेटवर अभिनेत्री अनन्या पांडेनं खुर्ची, रेझर मागवून चक्क त्याची मिशीच कापून टाकली. अनन्या पांडेनं कार्तिकची मिशी उडवण्याची खूप चर्चा नंतर रंगली. 'पती पत्नी और वो' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जरी लाँच झाला नसला तरी चित्रपटाच्या टीमने प्रमोशनला सुरुवात केली आहे. त्याताच भाग म्हणून ही मंडळी एका रिअॅलिटी शोमध्ये पोहोचले. त्या दिवशी अनन्या पांडेचा वाढदिवससुद्धा होता. त्यामुळे कार्तिकने अनन्याला त्याची मिशी कापायची परवानगी देऊन तिला वाढदिवसाची भेट दिल्याचे सांगितले. अनन्या आणि कार्तिक यांच्यातील मैत्रीचे किस्सेही सध्या गाजत आहेत. या दोघांची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. सारा अली खान आणि कार्तिकच्या ब्रेक अपलादेखील या दोघांची वाढती मैत्री कारण असल्याची कुजबूज आहे. बी टाऊनमधील क्युट कपल म्हणून अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचं नाव घेतलं जात असताना त्यांनी ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही सध्या आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असे ठरवले आहे. त्यांच्या कामापेक्षा या दोघांच्या अफेअरच्या चर्चा जास्त रंगू लागल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं दोघांचं म्हणण आहे. साराला मात्र या ब्रेक अपचा प्रचंड मानसिक त्रास होत असून ती ब्रेक अपचं दु:ख विसरायला मित्र-मैत्रिणींसोबत श्रीलंकेला गेली होती. तिला कार्तिकच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा होता आणि त्यामुळेच ती भारताबाहेर गेली' असं सांगण्यात आलंय. साराला ब्रेक अपचा त्रास होत असला तरी कार्तिक मात्र 'मूव्ह ऑन' झाल्याची चर्चा आहे. सध्या कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यात जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.