शेफ तैमूरने आई करिनासाठी बनवले कप केक्स - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

शेफ तैमूरने आई करिनासाठी बनवले कप केक्स

https://ift.tt/33oePkB
मुंबई: अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर फक्त 'स्टार किड' राहिला नसून, तो सोशल मीडियावरही साऱ्यांचा लाडका झाला आहे. यामुळं तैमूरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या त्याचे आणि करिनाचे शेफच्या वेशातले काही फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे छोट्या तैमूरनं करिनासाठी आइसक्रीम आणि केक बनवले. करिना कपूर तैमूरसोबत प्रसिद्ध शेफ विजय चौहान यांच्या कुकींग वर्कशॉपला गेली होती. यावेळी दोघांनीही एकसारखे टी-शर्ट्स घातले होते. तर दोघेही अॅप्रन घालून किचनमध्ये काम करताना पाहायला मिळाले. विजय चौहान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर करिना आणि तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. ' बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आईसस्क्रीम, आणि केक पाककृतींच्या वर्कशॉपला हजेरी लावली. तैमूरनं आईसाठी आइसक्रीम आणि कप केक बनवले', असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. करिना आणि सैफ यांच्या लाडक्या तैमूर अली खानची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. अलीकडंच करिना कपूर ऑस्ट्रेलियातील सिडनीत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथं तिच्या फॅन्सच्या एका गटाने तिला तैमूरचं एक पेंटिंग भेट म्हणून दिलं. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा: 'गुड न्यूज' होतोय डिसेंबरमध्ये प्रदर्शित करिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिचा आचा 'गुड न्यूज' चित्रपट येतोय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. 'गुड न्यूज' हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.याशिवाय करीना पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वाचा: