आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय: सुप्रिया सुळे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय: सुप्रिया सुळे

https://ift.tt/2qRnvmn
मुंबई: 'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात येतंय. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू,' अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कन्या व खासदार यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी आज सायंकाळी शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सत्तास्थापनेच्या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे. सुप्रिया सुळे यांनी आज केलेलं ट्विट याचंच निदर्शक आहे. भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. 'आजचा सूर्योदय नवा इतिहास रचणारा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्तानं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.