आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत?

https://ift.tt/2Oq2wQE
मुंबई: राज्याला आज (गुरुवार) नवा मुख्यमंत्री मिळण्याबरोबरच नवे मंत्रिमंडळही मिळणार आहे. एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळेल याचा अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात त्यांचे पुत्र आमदार असतील अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, असे असले तरी आदित्य पक्षाच्या टॉप टीमचा एक भाग असतील हे नक्की. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती मंत्रिमंडळात असतील तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो असे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. याच कारणामुळे आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते पक्ष संघटनेत वरच्या श्रेणीत सक्रिय राहतील हे नक्की. आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवणे फायदेशीर ठरू शकते असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. पक्षीय स्तरावर कार्यरत राहून २९ वर्षीय आदित्य ठाकरे अनेक जनतेच्या अनेक समस्या सोडवू शकतात आणि जबाबदाऱ्यांचेही वाटप करू शकतात असे पदाधिकाऱ्याने सांगितले. आपला पक्ष वाढवण्यासाठी ते राज्यभर दौरा करत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील असेही पदाधिकारी म्हणाला. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. काल (बुधवारी) आदित्य ठाकरे यांनी अन्य आमदरांसह आपल्या विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. आदित्य हे शिवसेनेचे युवा नेते आहेत.