व्हाॅट्सॲपवर अश्लील व्हिडिओ; एकास अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

व्हाॅट्सॲपवर अश्लील व्हिडिओ; एकास अटक

https://ift.tt/2KqrQDG
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः डाॅक्टरच्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका तरुणीला व्हाॅट्सॲपवर अश्लील पाठविणाऱ्या तरूणाला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. फरहान शेख असे या तरूणाचे नाव असून तो एका मेडिकल स्टोअर्समध्ये नोकरी करतो. डाॅक्टरकडे काम करणाऱ्या या तरुणीच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून अश्लील व्हिडिओ आला. याबाबत हटकल्यानंतर व्हिडिओ पाठवणारा शिवीगाळ करू लागला. त्यामुळे या तरूणीने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरिक्षक संजय निकुंबे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तरूणीच्या मोबाईलवरून शोध घेत असताना अश्लील व्हिडिओ पाठवणारा व्यक्ती असलेल्या एका ग्रुपमध्ये ही तरूणी असल्याचे समोर आले. त्यावरून हा तरूण फरहान शेख असून कामाठीपुरा येथील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करीत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. डाॅक्टर आणि मेडिकल स्टोअर्सने मिळून व्हाॅटसॲपवर एक ग्रुप तयार करण्यात आला होता. यातून फरहान याने तरूणीचा मोबाईल नंबर घेतला आणि हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.