'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा जखमी

https://ift.tt/2Xj8Zzy
मुंबईः अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या बायोपिकसाठी खास मेहनत घेतेय. ही भूमिका अगदी अस्सल वठवता यावी याची ती पुरेपूर खबरदारी घेतेय. अलीकडेच, परिणीती चित्रीकरणादरम्यान जखमी झाली असून तिच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. 'मी आणि 'सायना' चित्रपटाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेतात. मला कुठं दुखापत होऊ नये, याकडं त्याचं खास लक्ष असतं. पण, तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी शक्य तितका अधिक वेळ आराम करणार आहे.' असं परिणीतीनं म्हटलं आहे. 'सायना' चित्रपटासाठी परिणीती तज्ञांकडून बॅटमिंटनचे धडे घेतेय. इतकंच काय तर, तिनं काही दिवसांपूर्वी चक्क सायना नेहवालच्या घरी मुक्काम ठोकला होता. सायनाच्या घरी राहून भूमिकेची तयारी करण्यासाठी तिनं थेट सायनाचं घर गाठलं होतं. वाचाः परिणीतीच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाच्या जीवनपटात झळकणार होती. मात्र, तिच्या व्यग्र वेळापत्रकामुळं तिनं या चित्रपटातून एक्झिट घेतली व तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली.