आयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 17, 2019

आयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये!

https://ift.tt/2qY5lPy
मुंबई: 'अकाली गळणाऱ्या केसांची कथा' सांगणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या '' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरूच आहे. या चित्रपटानं भारतात ७० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. बाला चित्रपटानं आतापर्यंत जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, अशी माहिती आयुष्मान खुरानानं दिली आहे. बॉक्सऑफिसइंडिया.कॉमच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी ६.५० कोटींचा गल्ला जमवला. या कमाईसह हा चित्रपट ११ दिवसांत 'लुकाछिपी'च्या कमाईचा विक्रमही मोडू शकतो. बाला या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त झाली होती आणि या चित्रपटानं या शुक्रवारपर्यंत ७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट भारतात तीन हजार आणि जगभरात ५५० हून अधिक स्क्रीन्सवर झळकला आहे. सौदीमध्ये १४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचा हा सौदीत प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. बाला या चित्रपटात आयुष्मानसह भूमी पेडणेकर, यामी गौतम, सौरभ शुक्ला आदींनीही भूमिका साकारल्या आहेत. 'बाला'मध्ये केस गळतीनं त्रस्त असलेल्या एका तरुणाच्या भूमिकेत आहे. आयुष्मानच्या अभिनयाची कमाल पुन्हा एकदा या चित्रपटात पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'बाला' हा आयुष्मानचा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आयुष्माननं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 'बाला' कसा वाटला? बघा प्रेक्षक काय म्हणतात!