मी स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवतो: सौरव गांगुली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 3, 2019

मी स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवतो: सौरव गांगुली

https://ift.tt/2PHxCEv
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सुत्रे हाती घेतल्यापासून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण मी माझ्या अपेक्षा स्वत: ठरवतो, असं गांगुलीचं म्हणणं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीने भारतातील पहिल्या डे-नाइट कसोटीचा मार्ग मोकळा करून दिला. येत्या २२ रोजी भारताचा पहिला डे-नाइट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ पंचाचा तब्बल पाचवेळा मान मिळवणारे सायमन टफेल यांच्या 'फाईंडिंग द गॅप्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गांगुली उपस्थित होता. 'मी प्रचंड धैर्याने काम करणारा व्यक्ती आहे. ही गोष्ट मी माझ्या क्रिकेट करिअरमध्ये शिकलो आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर सांमजस्याने तोडगा काढण्याचं कसब अवगत झालं आहे. यातूनच स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवाव्यात हे मी शिकलोय, माझं आयुष्य इतरांच्या अपेक्षांवर कधीच चालत नाही', असं स्पष्ट मत गांगुलीने यावेळी व्यक्त केलं. अवघ्या ३ सेकंदात विराट डे-नाइट कसोटीसाठी तयार झाला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत डे-नाइट कसोटीबाबत चर्चा झाल्याच्याही उल्लेख यावेळी गांगुलीने केला. कोहलीने अवघ्या तिसऱ्या सेंकदात डे-नाइट कसोटीसाठी होकार दिला, असं गांगुलीने सांगितलं. याआधी भारतीय संघाने गेल्या वर्षी अॅडलेड ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाइट कसोटीसाठी नकार दिला होता. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या डे-नाइट कसोटीचं प्रयोजन पूर्णत्वास येऊ शकलं नव्हतं. वाचा: 'डे-नाइट कसोटीसाठी याआधी काय झालं आणि त्यामागची कारणं काय होती हे सर्व मला माहित आहे. पण कोहली डे-नाइट कसोटीसाठी सकारात्मक आहे हे मला दिसलं. कसोटी क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग वाढविण्यासाठी हा एक मार्ग असल्याचं कोहलीनेही मान्य केलं आहे', असं गांगुली म्हणाला. वाचा: टी-२० क्रिकेटमध्ये स्टेडियम नेहमी पूर्णपणे भरलेले आपल्याला पाहायला मिळतात हे मला माहित आहे. पण कसोटी क्रिकेटमध्येही काही बदल केले तर प्रेक्षकांची ओढ निर्माण होईल आणि कसोटीलाही सुगीचे दिवस येतील असा विश्वास असल्याचंही गांगुली म्हणाला.