वनडे ५० ऐवजी २५ षटकांचा असावा: तेंडुलकर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 5, 2019

वनडे ५० ऐवजी २५ षटकांचा असावा: तेंडुलकर

https://ift.tt/2PNpQss
नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये एका मोठ्या बदलाची गरज बोलून दाखवली आहे. आधुनिक काळात प्रेक्षकांचं हित आणि महसुलाच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये नवनवीन गोष्टी अवलंबल्यामुळेच खेळ आणखी समृद्ध होईल, असं सचिन म्हणाला. काळानुसार वन डे क्रिकेटमध्ये बदलाची गरजही त्याने बोलून दाखवली. वन डेमध्ये एकच डाव ५० षटकांचा आहे, त्याऐवजी दोन डाव प्रत्येकी २५-२५ षटकांचे असावेत आणि या डावांमध्ये १५ मिनिटांची विश्रांती असावी, जेणेकरुन वन डेमध्ये चार डाव खेळले जातील, असं सचिनने सूचवलं आहे. सचिन ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होता. “मी अगोदरच सूचवलेलं आहे, की या फॉरमॅटमध्ये आता एक नव्हे, तर २५-२५ षटकांच्या दोन डावांची गरज आहे,” अशी आठवणही सचिनने करुन दिली. वन डे क्रिकेटमधील बदलावर सचिनचं मत “या फॉरमॅटमध्ये (वन डे) अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या जोडल्या जाऊ शकतात. समजा, संघ अ आणि संघ ब यांच्यात ५० षटकांचा सामना आहे. अ संघाने नाणेफेक जिंकली आणि २५ षटके फलंदाजी केली. आता ब संघाला त्यांचा डाव खेळण्याची संधी मिळेल. यानंतर संघ अ २६ व्या षटकापासून पुढे त्यांच्या उरलेल्या विकेट्ससह डाव पुढे नेईन. अशा पद्धतीने संघ ब ला त्यांच्या दुसऱ्या डावात दिलेलं आव्हान पेलण्यासाठी मैदानात यावं लागेल. जर संघ अ पहिल्याच डावात सर्वबाद झाला, तर संघ ब ला आव्हानाचा सामना करण्यासाठी २५ षटकांचे दोन डाव असतील, ज्यात विश्रांतीही मिळेल. अशा विविध संकल्पना आहेत, ज्यावर काम करण्याची गरज आहे,” असं मत जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या सचिनने व्यक्त केलं आहे. “अनेक आव्हाने सोपी होतील” “वन डे क्रिकेटमध्ये नवे बदल केल्यास अनेक आव्हानांना सामोरं जाता येईल. मैदानावरील धुके किंवा दव हे गोलंदाजी करणाऱ्या संघाची चिंता वाढवणारं असतं. पण नव्या बदलांमुळे बॅकफूटवर गेलेल्या टीमला कमबॅक करण्याची आणखी एक संधी मिळेल,” असं सचिनला वाटतं. “सध्याच्या नियमानुसार, मैदानावर दव असेल आणि एका संघाने नाणेफेक जिंकली, तर अशा पद्धतीत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे कोणताही पर्याय नसतो. चेंडू ओला होतो, ज्यामुळे गोलंदाजाला अडचणीचा सामना करावा लागतो, जे न्यायपूर्ण नाही,” असंही सचिनने सांगितलं. “पावसामुळे खेळ धुतला जाणार नाही” ५० षटकांच्या ऐवजी २५ षटकांचे दोन डाव असतील आणि पावसाची शक्यता असेल, तर दोन्ही संघांना वेगळी रणनिती बनवता येऊ शकते, असं सचिनचं म्हणणं आहे. “प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्यापैकी कुणालाही डकवर्थ लुईस नियम समजलेला नाही. मला वाटतं, फक्त त्या दोन जेंटलमॅनलाच हे समजत असेल. पावसामुळे रद्द झालेला विजय हजारे ट्रॉफीतील सामना पाहा. हा सामना पावसामुळे वाया गेला आणि मुंबईला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. अनिर्णायक सामना कुणालाही आवडणार नाही,” असं मत सचिनने व्यक्त केलं.