अयोध्या: निकालानंतरही उरतात दोन पर्याय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

अयोध्या: निकालानंतरही उरतात दोन पर्याय

https://ift.tt/33wz54u
नवी दिल्ली: अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आज ७० वर्षांनंतर निकाल येत आहे. सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर सुप्रीम कोर्ट निकाल देत आहे. २.७७ एकर वादग्रस्त जमिनीसंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल अंतिम असल्याचे सांगितले जात असले तरी देखील, यानंतरी काही कायदेशीर पर्याय उरतात. या निकालामुळे असंतुष्ट झालेला पक्ष ३० दिवसांच्या आत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करू शकणार आहे. इतकेच नाही, तर जर या निकालावर एखाद्या पक्षाला काही हरकत असेल, तर सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह पिटिशन देखील दाखल केली जाऊ शकते. क्यूरेटीव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी मिळतो. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात काय त्रुटी आहेत, हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करावे लागणार आहे. विशेष म्हणजे पुनर्विचार याचिकेदरम्यान वाद-प्रतिवाद केले जात नाहीत. पहिल्या दिवशी देण्यात आलेल्या निकालाच्या फायलींवर तसेच रेकॉर्ड्सवरच काय तो विचार केला जातो. क्यूरेटीव्ह पिटिशनमध्ये काय असते? एखाद्या पक्षाला पुनर्विचार याचिकेवरील निकालावरही आक्षेप असेल, तर तो पक्ष क्यूरेटीव्ह पिटीशन दाखल करू शकतो. क्यूरेटीव्ह याचिकेवरी सुनावणीदरम्यान कोणत्याही तथ्यावर विचार केला जात नाही, तर केवळ कायदेशील पैलूंवरच विचार केला जातो. क्यूरेटीव्ह पिटिशनवर सुनावणीचे नियम कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्यूरेटीव्ह पिटीशनवरील सुनावणी मोठ्या पीठासमोर घेण्यात येते. क्यूरेटीव्ह पिटीशन प्रकरणी तीन सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांसमोर सुनावणी घेतली जाते. यावेळी निकाल देणारे इतर न्यायाधीशही उपस्थित असतात. अशा प्रकारे या प्रकरणी जर क्यूरेटीव्ह पिटिशन दाखल झाली, तर तीन वरिष्ठ न्यायाधीश आणि तीन उपस्थित न्यायाधीश अशा एकूण ६ न्यायाधीशांपुढे ही सुनावणी होऊ शकते.