मी काय रंगा-बिल्लासारखा आहे का?: चिदंबरम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

मी काय रंगा-बिल्लासारखा आहे का?: चिदंबरम

https://ift.tt/2R0qPpY
नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी गेले ९९ दिवस तुरुंगात असणारे माजी अर्थमंत्री पी. यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला विचारले,'मी रंगा-बिल्ला सारखा गुन्हेगार आहे का?' त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी उद्विग्नतेने हा प्रश्न विचारला. दरम्यान त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. रंगा आणि बिल्ली या दोन गुन्हेगारांना १९७८ साली दिल्लीत दोघा भावंडांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या दोघांनाही १९८२ मध्ये फाशी देण्यात आली. माझ्या विरोधात एकही साक्ष नाही: चिदंबरम चिदंबरम यांच्या वतीने बुधवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या युक्तीवादात असं म्हटलं आहे की त्यांना अयोग्य पद्धतीने केवळ यासाठी तुरुंगात ठेवले आहे की ते आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवरहार प्रकरणातील मुख्य आरोपी कार्ती चिदंबरम यांचे पिता आहेत. या प्रकरणाशी जोडण्यासाठी आपल्याविरोधात एकही साक्ष नसल्याचे चिदंबरम यांनी कोर्टाला सांगितले. चिदंबरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्या. आर. भानुमति यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सांगितले की, 'दिल्ली उच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की जर चिदंबरम यांना जामिनावर सोडलं तर देशात तो चुकीचा संदेश जाईल. मी काय रंगा-बिल्लासारखा गुन्हेगार आहे का? असं चिदंबरम विचारत आहेत.' चिदंबरम यांच्यावतीने कपिल सिब्बल यांच्यासह अभिषेक मनु सिंघवी यांनीही युक्तीवाद केला. ईडीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह सिब्बल म्हणाले, 'सक्तवसुली संचालनालयाला २०१८ पासून तीन साक्षीदारांबद्दल माहिती होती तर चिदंबरम यांना या साक्षीदारांचा सामना करण्यासाठी आधी का बोलावलं नाही. या संपूर्ण प्रकरणात अशी कुठली व्यक्ती आहे, जिच्या विरोधात कुठली साक्ष नाही तर ते चिदंबरम आहेत. पण ते एकटेच आहेत, जे या प्रकरणात तुरुंगाता आहेत आणि अन्य सर्व जण जामिनावर आहेत.' चिदंबरम यांच्या वतीने दोन्ही वकिलांचा युक्तीवाद बुधवारी पूर्ण झाली. आता गुरुवारपासून ईडीच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करणार आहेत.