उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चं संपादकपद सोडलं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चं संपादकपद सोडलं!

https://ift.tt/34te4bs
मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चं संपादकपद सोडलं आहे. उद्धव ठाकरे हे आज, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच ते 'सामना'च्या संपादकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. यापुढं या वृत्तपत्राची संपूर्ण जबाबदारी ही यांच्याकडे असणार आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. 'सामना' म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे 'सामना' असंच समीकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले. देशातील महत्वाच्या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून कोणती 'रोखठोक' भूमिका मांडली आहे, याकडे देशभरातील माध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे टीकेची झोड उठवत होते. देशभरातील माध्यमांचं लक्ष असणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादकपद उद्धव यांनी सोडलं आहे. ते आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या वृत्तपत्राची संपूर्ण जबाबदारी सध्या कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे.

संजय राऊत टीकास्त्र सोडणार! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. त्यांनी अग्रलेखातून देशातील आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडली आहे. मात्र आता त्यांनी ही जबाबदारी सोडली आहे. ते आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून राऊत यांच्याकडे कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडणारे संजय राऊत यांचे बाण कुणाला घायाळ करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.