सुप्रियाताईंनी घेतली अजितदादांची गळाभेट! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 27, 2019

सुप्रियाताईंनी घेतली अजितदादांची गळाभेट!

https://ift.tt/35zGVLl
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेला अखेर आजच्या दिवसाचा मुहूर्त मिळाला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचं सरकार स्थापन होत आहे. आमदारांच्या शपथविधीसाठी आज सकाळीच तिन्ही पक्षांचे आमदार विधानभवनात पोहोचले आणि तिथेच तो क्षण आला... राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे बहिण-भाऊ समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हा भाऊक क्षण न टिपला असता तरच नवल.. सुप्रिया सुळे विधानभवनाच्या दारातच सर्वांचं स्वागत करण्यासाठी उभ्या होत्या. तेवढ्यात अजित पवार आले आणि दोघांनी गळाभेट घेत एक हसरा कटाक्ष टाकला. कॅमेऱ्यांना छान पोझ दिली आणि गेल्या चार दिवसांची कटुता जणू साखरेसारखी विरघळली. शनिवारी पहाटे अजितदादांनी बंडाचं हत्यार उगारल्यानंतर पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अप अकाउंटच्या स्टेटसमधून यासंबंधीचे ट्विटही केले होते. माध्यमांना सामोरे जातानाही त्या भावुक झाल्या होत्या. मात्र आज हा वाद, मतभेदांची कटुता या गळाभेटीत विरघळून गेली. आदित्य ठाकरेंनाही आलिंगण शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन होत आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आणि ठाकरे घराण्यातील पहिले-वहिले आमदार आदित्य ठाकरे हेही आज शपथविधीसाठी विधानभवनात आले आणि सुप्रिया सुळेंनी त्यांचीही गळाभेट घेतली.