शरद पवारांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

शरद पवारांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी

https://ift.tt/2CO71Oj
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता असली तरी, येत्या दोन दिवसांत म्हणजे रविवारपर्यंत सरकार स्थापन करणे अवघड असल्याचे संकेत दस्तुरखुद्द यांनी शुक्रवारी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या, रविवारी असल्याने या दिवशी सरकार स्थापन व्हावे, असे नेत्यांचे प्रयत्न व शिवसैनिकांची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र, पवार यांच्या वक्तव्यामुळे हा दिवस टळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी विविध घटकांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अनौपचारिक चर्चेदरम्यान रविवार, १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. यावर ‘दोन दिवसांत सरकार स्थापन करणे अवघड आहे’. त्यासाठी भरपूर वेळ लागेल, घाईने काही सांगता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडल्याचे कळते. सोनिया यांच्याशी पुन्हा चर्चा दरम्यान, मुंबईत दोन दिवसांपासून आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरबैठका सुरू आहेत. तथापि, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी पवार परत चर्चा करणार असल्याचे समजते. त्यासाठी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यात किमान-समान कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नव्या आघाडीला मूर्त रूप येईल. यानंतर सरकार स्थापनेचा दावा केल्यावर प्रत्यक्ष शपथविधीला वेळ लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.