'पानिपत'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणतात... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

'पानिपत'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणतात...

https://ift.tt/2X3zA3m
मुंबई: आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'पानिपत: द ग्रेट बेट्रेयल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या भव्य सिनेमाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा होतेय. हा ट्रेलर पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं. या यादीत आता अजून एक नाव जोडलं गेलंय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचं. 'पानिपत'च्या ट्रेलरचं आणि आशुतोष गोवारीकर यांच्या कामाचं कौतुक करणारं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे. 'दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा' असं म्हणत राज ठाकरे यांनी चित्रपटाचा ट्रेलरही त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर पानिपत चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडणात येणार आहे. 'पानिपत' च्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही कथा आहे. इसवी सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. पानिपतच्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचे फर्स्ट लुक सोमवारीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या भव्य सिनेमामध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस मराठी कलाकार असल्याचं समजतंय. गश्मीर महाजनी, अर्चना निपाणकर, शैलेश दातार, ज्ञानेश वाडेकर, कश्यप परुळेकर, कृतिका देव यांच्यासह आणखीही कलाकार यात झळकणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अर्जुन कपूरची निवड प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही. अर्जुनची तुलना 'बाजीराव-मस्तानी'मधल्या रणवीर सिंगच्या बाजीरावाच्या भूमिकेशी केली जातेय. उलट संजय दत्त मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं सोशल मीडियावर दिसून येतंय. याशिवाय आणखी कोणते मराठी कलाकार यात कोणत्या भूमिकांत चमकणार आहेत ते पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.