#पुन्हानिवडणूक?; मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

#पुन्हानिवडणूक?; मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण

https://ift.tt/32XD6Os
मुंबईः महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली अजूनही सुरू असतानाच ट्विटरवर काही मराठी कलाकारांनी सुरू केलेला #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग त्यांना चांगलाच महागात पडला आहे. या कलाकारांना नेटकऱ्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर सडकून टिका केली आहे. कलाकारांनी राजकारणात पडू नये असे सल्लेही काहींनी त्यांना दिले आहे. या सगळ्याप्रकरणात आता मराठी कलाकारांनी त्यांच्या या ट्वीटचे स्पष्टीकरण देतं कोणाचीही दिशाभूल करण्याचा आमचं हेतू नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. हाच निवडणुकीचा धुराळा आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्यासोबत ते शेअर केलं. त्यामागची आमची भूमिका लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेल सुद्धा.' , सिद्धार्ध जाधव यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी #पुन्हानिवडणूक? असं लिहून ट्विट केलं होतं. मराठीतील हे मोठे कलाकार अचानक हा हॅशटॅग का वापरत आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. दरम्यान, कलाकारांनी केलेली ही पोस्ट राजकीय नसून आगामी 'धुराळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होती असं स्पष्ट झालंय.