गणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिकनं व्यक्त केलं दुःख - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

गणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिकनं व्यक्त केलं दुःख

https://ift.tt/2qX96ES
मुंबईः महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर पटना येथे उपचार सुरू होती. नारायण यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच अभिनेता हृतिक रोशननंही दुःख व्यक्त केलंय. वशिष्ठ यांची भारताचे स्टिफन हॉकिंग म्हणून ओळख होती. 'अनेकांना माहिती नाहीये की आपण किती मोठ्या गणितज्ञांना गमावलंय, वशिष्ठ नारायण सिंह यांचा बिहारमधील एका छोट्याशा गावात जन्म झालाय. त्यांनी कित्येक अवघड गणितं सोडवली आहेत.' असं ट्विट हृतिकनं केलंय. वशिष्ठ यांनी नासा आणि कॅलिफॉर्निया विद्यापीठात काम केलंय. वशिष्ठ नारायण यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पुन्हा घरी नेण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळं पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं जवळपास एक तास वशिष्ठ यांचा मृतदेह रुग्णालयाबाहेरच असल्याचं समोर आलं आहे.