'गुलाबी' कसोटीसाठी 'असा' असेल भारतीय संघ! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

'गुलाबी' कसोटीसाठी 'असा' असेल भारतीय संघ!

https://ift.tt/35ziZYD
कोलकाताः यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून कोलकातामधील प्रसिद्ध इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. प्रकाशझोतातील आणि गुलाबी चेंडूने खेळली जाणारी भारताची पहिली कसोटी असून या कसोटीसाठी भारतीय संघ कसा असणार आहे, याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे. आज दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या सलामीच्या फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल येतील. बांगलादेशविरुद्ध इंदूर येथे खेळलेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. परंतु, मयंक अग्रवालने तुफानी खेळी केली होती. मयंकने इंदूरच्या मैदानावर २४३ धावांची जबरदस्त खेळी करून बांगलादेशच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली होती. तसेच मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. इडन गार्डनवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या डे-नाइट कसोटीत पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत जबरदस्त खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी चेतेश्वर पुजारा येईल. पुजाराने इंदूरमध्ये चांगला खेळ केला होता. डे-नाईट कसोटीत धावा वाढवण्याची खरी जबाबदारी ही विराट कोहलीवर असणार आहे. कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. परंतु, इंदूरमध्ये खाते न उघडताच विराटला माघारी परतावे लागले होते. कोहलीने बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यात २५६ धावा केलेल्या आहेत. विराटनंतर धावा करण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर असणार आहे. इंदूरमध्ये रहानेने ८६ धावा केल्या होत्या. या ऐतिहासिक कसोटीत विकेटकीपर म्हणून वृद्धीमान साहा दिसल्यास नवल नाही. इंदूरमध्ये साहाने विकेटकीपर म्हणून चांगली जबाबदारी सांभाळली. परंतु, फलंदाज म्हणून फारसी चमक दाखवता आली नव्हती. अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जाडेजाला संघात स्थान मिळू शकते. संभाव्य भारतीय संघ रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), वृद्धीमान साहा, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव. संघः भारत वि. बांगलादेश खेळः प्रकाशझोतातील पहिली कसोटी स्थळः इडन गार्डन कधीः वेळ दुपारी १ पासून