मोबाईल दिला नाही म्हणूुन विद्यार्थ्याची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2019

मोबाईल दिला नाही म्हणूुन विद्यार्थ्याची आत्महत्या

https://ift.tt/2CStNVh
: परीक्षा सुरू आहेत. मोबाईलवर खेळू नको असे सांगून बापाने मोबाईल हातातून घेऊन टाकला. हा राग मनात ठेवून सतरा वर्षीय विद्यार्थ्याने केल्याची घटना हनुमाननगर भागात घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव रोहन रमेश दांडगे असे आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन दांगडे हा पाॅलिटेक्नीक काॅलेज मध्ये शिकत होता. त्याची परिक्षा सुरू होती. रविवारी (१७ नोव्हेंबर ) दुपारी ५ वाजेच्या दरम्यान रोहन घरात मोबाईलवर गेम खेळत होता. त्याला रोहन चे वडीलांनी परिक्षा असताना मोबाईल का खेळतो? असे सांगुन मोबाईल हातातून घेऊन टाकले. हा राग मनात ठेवून रोहन घराच्या दुस-या मजल्यावरील एका खोलीत गेला. तेथे एका दोरीने गळफास लावून घेतले. रोहनला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता घाटीच्या डाॅक्टराने रोहनला मृत घोषीत केले. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोहेका रवी बिरारे हे करीत आहेत.