रिंकू राजगुरू हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2019

रिंकू राजगुरू हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार

https://ift.tt/32UCQQe
''च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. तो सिनेमा फ्लॉप ठरला. तिच्याकडे ऑफर्स अनेक असल्या, तरी ती नेमक्या कुठल्या सिनेमात दिसणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. पण, सध्या ती एक हिंदी वेब सीरिज करत असल्याचं कळतंय. एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत ती काम करतेय म्हणे. या वेब सीरिजचं चित्रीकरण माटुंग्याच्या एका चाळीमध्ये सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताही चमकणार आहे. सध्या अनेक कलाकार डिजिटल माध्यमाकडे वळले आहेत. रिंकूनंही वेब सीरिजची निवड केली आहे. या वेब सीरिजचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, त्याचं चित्रीकरण जोरात सुरू असल्याचं दिसतंय. चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची तिची भूमिका असल्याचं बोललं जातंय. रिंकूची ही पहिलीच वेब सीरिज असेल.