मुंबई: रणबीर कपूर-आलिया भट लग्न करणार असल्याची चर्चा आहे. खरं-खोटं त्यांनाच ठाऊक. पण, खुद्द दीपिकाच त्याविषयी बोलली तर? एका कार्यक्रमाला आणि आलिया एकत्र आल्या होत्या. या कार्यक्रमात दीपिका'आलिया देखील लवकरच लग्न करणार आहे' असं बोलून गेली. त्यामुळं आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विजयला, 'तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते'? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यानं पटकन दीपिका आणि आलियाचं नाव घेतलं. मात्र दीपिका लगेच म्हणाली की, 'माझं लग्न तर झालंय आणि आलियाचंही आता होणार आहे'. यावरून तिच्या लग्नाच्या बातमीला दीपिकानंच दुजोरा दिलाय असं म्हटलं जात आहे. दीपिकानं केलेल्या या वक्तव्यांमुळं आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी आलिया रणबीरच्या कुटुंबियांसोबत डिनरला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दोघे सध्या ब्रम्हात्र चित्रपटाच्या शुटिंगसाठी हिमाचल प्रदेशच्या मनाली इथं गेले आहेत. रणबीर आणि आलिया आपल्या लग्नाबद्दल मोकळेपणानं काही बोलत नसले तरी त्यांनी आपलं नातं मात्र कधी लपवलं नाही. असं असलं तरी या दोन्ही कलाकारांकडून मात्र अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा मिळालेला नाही. वाचा: आलिया आणि रणबीरच्या नात्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. अनेक कार्यक्रमांत ते दोघे एकत्र दिसतात. त्यामुळं लवकरच त्यांचं शुभमंगल होणार असल्याच्या बातम्या येत असतात. लग्नाबाबत हे दोघंही कधीच खुलेपणानं बोलत नसले तरी काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. वाचा: दरम्यान, दोघंही सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे दोघं केनियालाही गेले होते. त्यांच्या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सोडला तर आपल्या रिअल लाइफ गर्लफ्रेन्डसोबत रिल लाइफमध्ये काम करण्यास रणबीरनं नकार दिल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी रंगली होती.