Live:मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 28, 2019

Live:मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार

https://ift.tt/37OrvVB
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स: >> राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद व राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा उपाध्यक्षपद असे सरकारमधील प्रमुख पदांचे वाटप >> मुंबई: राज्य मंत्रिमंडळ शपथविधीसाठी काँग्रेसकडून अद्याप नावे जाहीर नाहीत >> मुंबई: शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ >> शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार