'हेरगिरी'प्रकरणी श्वेतपत्रिका काढा: जितेंद्र आव्हाड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 1, 2019

'हेरगिरी'प्रकरणी श्वेतपत्रिका काढा: जितेंद्र आव्हाड

https://ift.tt/2Wy4LUq
ठाणे: इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससाच्या माध्यमातून भारतीय आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली असून कुणाचेही आयुष्य सुरक्षित राहिलेले नाही, अशी टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार यांनी राज्य सरकारकडे या गंभीर प्रश्नी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. या हेरगिरीच्या माध्यमातून दलित कार्यकर्ते आणि पत्रकारांना लक्ष्य करण्यात आल्याचेही आव्हाड यांचे म्हणणे आहे. हेरगिरीचे हे डिव्हाईस अत्यंत महागडे असून यासाठी खर्च कुणी केला सरकारने स्पष्ट करावे अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारची हेरगिरी करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी अशी हेरगिरी कोणत्या कायद्यात बसते तेही सरकारने स्पष्ट करावे अशीही मागणी आव्हाड यांनी केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड लवकरच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार घेऊन याबाबतची मागणी करणार आहेत. वाचा- काय आहे प्रकरण हॅकर्सनी एक स्पायवेअर तयार केलं आहे ,ज्याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपचा डेटा अॅक्सेस केला जातो. एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केलं आहे. एनएसओ समूहाने Pegasus नावाचं हे टूल तयार केलं असून Google Drive किंवा iCloud चा डेटा अॅक्सेस करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर तुमचे फेसबुक मेसेंजरसुद्धा अॅक्सेस करू शकतं. एनएसओ समूहाने १,४०० यंत्रांमध्ये (मोबाइल) धोकादायक मालवेअर घुसवून संबंधित वापर कर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप उपयोजनांतील माहिती चोरली आहे. इस्रायली तंत्रज्ञान समूहाने काही मोबाइलधारकांची व्हॉट्सअ‍ॅप माहिती चोरून त्यांच्यावर पाळत ठेवली, असं व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनीही स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे एकूण १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यात वापरकर्त्यांस व्हिडीओ कॉल येत असे व नंतर त्यातून मालवेअर व स्पायवेअर मोबाइलमध्ये सोडले जात असे. त्यामुळे कॉलला उत्तर देणेही वापरकर्त्यांस शक्य होत नसे. एनएसओ समूहाने संयुक्त अरब अमिरातीतील एका कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी मदत केली होती, पीगॅसस हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून सगळीच माहिती काढून घेते.