ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन

https://ift.tt/335nJU9
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 'अग्रलेखांचा बादशहा' अशी ओळख असणारे खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.