भटक्या गुरांसाठी आयआयटी मुंबई बांधणार गोठा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 1, 2019

भटक्या गुरांसाठी आयआयटी मुंबई बांधणार गोठा?

https://ift.tt/335BjHT
म. टा. प्रतिनिधी, मुंबई कधी वर्गात गाय दिसते तर कधी बैल विद्यार्थ्याला धडक देतो... मुंबईच्या पवईतील संकुलात या घटना वारंवार घडू लागल्या असून, संकुलात फिरणाऱ्या गायी-बैलांमुळे आयआयटीचे प्रशासन हैराण झाले आहे. या भटक्या गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी संकुलात आता चक्क गोठाच बांधण्याची शिफारस त्यासंदर्भात विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने केली आहे! आयआयटी मुंबई संकुलात सध्या गाय-बैलांचा वावर वाढला आहे. त्याविषयी विद्यार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने संकुलातील गायींची काहीतरी व्यवस्था करावी यासाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. तपनेंदू कुंडू यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापकांची एक समिती स्थापन केली. या समितीने अनेक बैठका घेतल्या. संस्थेतील गायी बाहेर जाऊ नये असे बहुतांश रहिवाशांना वाटत असल्याचे मत या बैठकांमध्ये मांडण्यात आले. त्यामुळे अखेर गायी संकुलातच सांभाळण्याची तयारी समितीने दर्शविली आहे. यासाठी आठ क्रमांकाच्या वसतिगृहामागील मोकळा परिसर राखीव ठेवण्याची सूचना समितीने केली आहे. गोसंवर्धनासाठी... -गायींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावर जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. जेणेकरून त्या नेमक्या कुठे आहेत हे सुरक्षा रक्षक तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना समजू शकेल. -गायींची काळजी घेण्यासाठी काही जणांची नियुक्ती केली जाईल. गोरक्षणासाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांची नियुक्ती करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. -गायींना त्यांची हक्काची जागा मिळावी यासाठी उभारण्याची सूचनाही करण्यात आली आहे. -याबाबतची माहिती आयआयटी विद्यार्थ्यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘इनसाइट’ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.