कृती खरबंदाला नखरे भोवले; 'चेहरे'तून आऊट! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2019

कृती खरबंदाला नखरे भोवले; 'चेहरे'तून आऊट!

https://ift.tt/2CQoEgf
मुंबई: सध्या आपल्या अलीकडेच रिलीज झालेल्या सिनेमाचं 'हाऊसफुल्ल ४' चं यश एन्जॉय करत आहे. याशिवाय ती तिचा आगामी सिनेमा 'पागलपंती' च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पागलपंतीनंतर कृतीला खरं तर 'चेहरे' या सिनेमातही भूमिका करण्याची संधी मिळाली होती; पण तिने ही संधी दवडली. तिला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शूटिंगच्या वेळी तिचे चाललेले नखरे म्हणे सिनेमाच्या निर्मात्यांना झेपले नाहीत. 'चेहरे' सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान कृती खूप नखरे करत होती आणि तिच्या टीमने डेट्समध्येही खूप गोंधळ उडवला. त्यामुळे तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आले. असंही म्हटलं जातंय की कृतीच्या अनेक मागण्या निर्मात्यांनी मान्यही केल्या होत्या तरी अखेर तिच्यासोबत काम करणं त्यांना मुश्किल होऊ लागलं. काही मुद्द्यांवर कृती आणि सिनेमाचे दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्यात वाद झाला, असंही बोललं जातंय. आता सिनेमाची टीम नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहे. या सिनेमाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंगही कृतीने पूर्ण केलं होतं. आता नव्या अभिनेत्रीसोबत या संपूर्ण भागाचं नव्याने शूटिंग करावं लागणार आहे. आता 'चेहरे' मध्ये कृतीच्या ऐवजी नवा कोणता चेहरा येतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. हा सिनेमा एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.