दुबई: इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं मिळवलेल्या दणदणीत विजयात मोलाची भूमिका निभावणारा गोलंदाज आणि सलामीवीर यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण सात विकेट घेणाऱ्या शमीनं गोलंदाजांच्या क्रमवारीत सातवे स्थान पटकावले आहे. त्याच्या नावावर आता ७९० गुण आहेत. तर मयांकनं फलंदाजांच्या क्रमवारीत अकरावे स्थान मिळवले आहे. आयसीसीची ताजी कसोटी क्रमवारी रविवारी जाहीर झाली. या कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज मयांक अग्रवालनं मोठी झेप घेतली आहे. शमीनं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात २७ धावा देत तीन विकेट आणि दुसऱ्या डावात ३१ धावा देऊन चार विकेट घेतल्या. कसोटी सामन्यात एकूण आठ विकेट घेणाऱ्या शमीनं कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांनी झेप घेऊन सातवं स्थान मिळवलं आहे. त्याचे आता एकूण ७९० गुण झाले आहेत. गुणांच्या बाबतीत भारताच्या कसोटी इतिहासात कपिल देव (८७७) आणि जसप्रीत बुमराह (८३२) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. बांगलादेशविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोच्च २४३ धावांची खेळी करून सामनावीर ठरलेला मयांक अग्रवालनं फलंदाजांच्या क्रमवारीत अकराव्या स्थानी झेप घेतली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आठ कसोटी सामन्यांत त्यानं ८५८ धावा केल्या आहेत. त्याचे एकूण ६९१ गुण आहेत. सुरुवातीच्या आठ कसोटी सामन्यांत केवळ सात फलंदाजांनी मयांकहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात डॉन ब्रॅडमन (१२१० धावा), एवर्टन वीक्स (९६८), सुनील गावस्कर (९३८), मार्क टेलर (९०६), जॉर्ज हेडली (९०४), फ्रॅंक वारेल (८९०) आणि हर्बर्ट सटक्लिफ (८७२) यांचा समावेश आहे. टॉप टेनमध्ये भारताचे चार फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल दहा जणांमध्ये भारताचे चार फलंदाज आहेत. कर्णधार दुसऱ्या, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्य रहाणे पाचव्या आणि रोहित शर्मा हा दहाव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजानं फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेत ३५ स्थानी पोहोचला आहे.