नव्या मैत्रीचा सेनेला फायदा... ५ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2019

नव्या मैत्रीचा सेनेला फायदा... ५ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार?

https://ift.tt/35521kA
मुंबई: भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचं वाटप समसमान होणार आहे. भाजपकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेसाठी ही लॉटरी असल्याचं मानलं जात आहे.

वाचा:

समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपशी टोकाचे मतभेद झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या काँग्रेसनं नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच, तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम व सत्तावाटपासंबंधीच्या चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांचं हित हा तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमामधील प्रमुख मुद्दा असणार आहे. राष्ट्रवादीला गृह तर, काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप १४-१४-१२ असं होणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १४ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखाते राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खातं काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ व नगरविकास खातं शिवसेनेकडं राहणार आहे. सरकार स्थापनेनंतर कुठलेही वाद होऊ नयेत आणि सर्व मुद्दे आताच स्पष्ट व्हावेत, असा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. असे आहे पक्षीय बलाबल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.