सॉफ्ट, स्मूथ आणि हायड्रेटेड केसांसाठी प्रभावी आहे नारळाचे दूध, वापरा फक्त ‘या’ प्रकारे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 6, 2025

सॉफ्ट, स्मूथ आणि हायड्रेटेड केसांसाठी प्रभावी आहे नारळाचे दूध, वापरा फक्त ‘या’ प्रकारे

सॉफ्ट, स्मूथ आणि हायड्रेटेड केसांसाठी प्रभावी आहे नारळाचे दूध, वापरा फक्त ‘या’ प्रकारे

आजच्या धावपळीच्या जीवनाचा, प्रदूषणाचा, खाण्याच्या वाईट सवयींचा आणि ताणतणावाचा परिणाम आपल्या केसांवर स्पष्टपणे दिसून येतो. केस कोरडे, निर्जीव होतात आणि दुतोंडी केसांच्या समस्या निर्माण होतात. अशावेळेस अनेकजण महागड्या केसांच्या ट्रीटमेंट्स करण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे अधिक प्रभावी आणि सुरक्षित मानत आहे. तर केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी व वाढीसाठी नारळाचे दुध उत्तम आहे.

कारण नारळाचे दूध केसांच्या काळजीसाठी एक उत्कृष्ट पोषक तत्व आहे. त्यातील व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि आवश्यक फॅटी ॲसिड केसांना हायड्रेशन आणि ताकद देतात. यासाठी स्मुथ, हायड्रेटेड आणि निरोगी केस मिळविण्यासाठी घरी नारळाच्या दुधाने बनवता येणाऱ्या काही उत्तम DIY हेअर मास्क आहेत ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

नारळाचे दूध आणि कोरफड जेल हेअर मास्क

हे हेअर मास्क डोक्यातील कोंडा, खाज आणि कोरडेपणा दूर करते आणि स्कॅल्पला आराम देते.

हेअर मास्क कसे बनवावे: 1 टेबलस्पून ताजे कोरफड जेल 2 टेबलस्पून नारळाच्या दुधात चांगले मिक्स करा आणि स्कॅल्पला लावा, हलक्या हाताने मालिश करा. 30 मिनिटांनी सौम्य शाम्पूने धुवा.

नारळाचे दूध आणि मधाचा हेअर मास्क

हे हेअर मास्क केसांना खोलवर हायड्रेशन देते, केस स्मुथ आणि चमकदार बनवते.

हेअर मास्क कसे बनवावे : 1 टेबलस्पून शुद्ध मध आणि 2 टेबलस्पून नारळाचे दूध घेऊन मिश्रण चांगले मिक्स करा. हे तयार मिश्रण केसांच्या लांबीवर लावा आणि 25-30 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा.

नारळाचे दूध आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क

हे हेअर मास्क स्प्लिट एंड्स कमी करते.

हेअर मास्क कसे बनवावे: 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल थोडेसे कोमट करा , त्यात 2 टेबलस्पून नारळाचे दूध मिक्स करा आणि केसांच्या मुळांमध्ये चांगले मसाज करा आणि 30 मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.

नारळाचे दूध आणि केळीचा हेअर मास्क

हे हेअर मास्क केसांच्या फ्रिजनेसपणा नियंत्रण ठेवते आणि केसांना खोल कंडिशनिंग देते.

हेअर मास्क कसे बनवावे: 1 पिकलेले केळं मॅश करा आणि त्यात 2 चमचे नारळाचे दूध मिक्स करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. 30 मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.

नारळाचे दूध आणि मेथीचा हेअर मास्क

हे हेअर मास्क केस गळती थांबवते, स्कॅल्पला पोषण देते आणि केसांच्या वाढीला चालना देते.

हेअर मास्क कसे बनवावे: 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे दाणे बारीक करा. त्यात 2 चमचे नारळाचे दूध मिक्स करा. आता हा तयार हेअर मास्‍क टाळूवर लावा आणि 40 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवा.

हे नारळाच्या दुधाचे हेअर मास्क सर्व प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर आहेत. आठवड्यातून एकदा सॉफ्ट, स्मुथ आणि हायड्रेटेड केसांसाठी कोणतेही दुष्परिणाम न होता त्यांचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)