भाजपला शुभेच्छा; पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 10, 2019

भाजपला शुभेच्छा; पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच: राऊत

https://ift.tt/2Q1pVZJ
मुंबई : शिवसेना खासदार यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं संजय राऊत यांनी स्वागत केलं. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्तास्थापनेचा दावा करणं ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. मात्र भाजपने विलंब केला. आता राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय बहुमत सिद्ध करता येणार नाही हे शिवसेनाही ओळखून आहे. त्यामुळेच भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावं असं आव्हान वारंवार शिवसेना देत आहे. ‘भाजपने सत्तास्थापनेसाठी थांबण्याची गरज नव्हती. पुढच्या २४ तासात त्यांनी सत्तास्थापन करायला हवी. राज्यपालांच्या पुढाकारानेच नवं सरकार मिळू शकेल. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा तरी भाजपने लाभ घ्यावा,’ असं संजय राऊत म्हणाले. शिवाय राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, हे सांगायलाही संजय राऊत विसरले नाही. वाचा : भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला. कुणाचेही आमदार फुटणार नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार सध्या मुंबईतील मालाडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री सर्व आमदारांशी चर्चा केली आणि हॉटेलमध्येच मुक्कामही केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आमदारांना भेटण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेनेही हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांशी कुणीही संपर्क करु नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. आमदारांची सर्व जबाबदारी खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम या वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. वाचा : भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. भाजपने अजूनही या निमंत्रणाला उत्तर दिलेलं नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर निर्णय होईल आणि त्यानंतरच पुढील भूमिका जाहीर केली जाईल. मुनगंटीवार शनिवारी रात्रीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी दाखलही झाले होते. वाचा : राज्यातील सध्याची परिस्थिती राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं असलं तरी ते अजून भाजपने स्वीकारलेलं नाही. निमंत्रण स्वीकारल्यास भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून ठराविक कालावधी दिला जाईल. विधानसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यास भाजपचं नवं सरकार अल्पावधीचंच ठरेल. त्यामुळेच सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. सर्वात मोठ्या पक्षाला बहुमत सिद्ध न करता आल्यास राज्यपाल दुसरा पर्याय शोधतील किंवा शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.